Saturday 22 September 2012

बरा न होणारा आजार

And now friends, here is a short story in Marathi.
What happens when one is traveling daily in a bus crowded by known people? Just see what happened with our dear friend Bandu who is working in a Nationalized Bank. He has to commute daily in a local bus between Bandra Railway station and his office at Bandra Kurla Complex. 

मित्रानो, एक विनंती: मराठी माझी मातृभाषा नसल्यामुळे कथेत काही त्रुटी असणे साहजिक आहे. राग मानू नका आणि माझ्या चूका माज्या निदर्शनात आणून ध्या. धन्यवाद! 
 


कथा बंडूची-१.बरा  होणारा आजार किशोर पटेल 

एक गोष्ट बंडूला समजत नव्हती. एरवी बेन्केत खूप चांगली वागणारी माणसं  बांद्रयाला  बसमध्ये  बसल्या नंतर त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. 
असेल. मी इकडे नवीन आहे ना? ओळख वाढली कि लोक हात करणार. नमस्कार करणार. काय मग, रमी मध्ये किती प्लस वगेरे विचारपूस करणार. एखादा गुड मोर्निंग सुध्धा म्हणणार. थोडे दिवस जाऊ दे.
थोडे दिवस गेले. बंडूच्या ओळखी वाढल्या. काही जणा बरोबर सूत जमल. दुपारी जेवायला आणि जेवल्या नंतर खाली फिरायला जायला कंपनी मिळू लागली.
पण बसमधली ती गोष्ट बंडूला समजण्यापलीकडची होती. काल ज्या सहकर्मचारीला त्याने चहा पाजला  होता त्याने सुध्धा बसमध्ये त्याला ओळख दाखवली नाही.
बंडू नवीन होता. भोळाभाबडा होता. असेल, काही तरी कारण असेल. ते बोलवत नाही म्हणून काय आपण गप्प बसायचंबंडूनी एकाला नमस्कार म्हटलं.  योगायोग असा झाला  कि कंडक्टर  प्रथम  बंडूकडे च आला. बंडूने आपल्या बरोबर त्या मित्राचे पण तिकीट काढले.  
एकदा बंडू पुढच्या सीटवर बसला होता. तिकडे बसलं तर बीकेसीच्या स्टोपला उतरून  धावत जाऊन लिफ्टच्या लाईनीत लौकर नंबर लावता येतो. एकाने मागून आवाज दिला, 'काय बंडूकसं काय? काय बातमी नवा काळ मध्ये?'   
त्याने समोरून ओळख दाखवली म्हणून बंडू सुखावला. किती चांगला माणूस आहे हा? बंडूने त्याला नवा काळ वाचायला दिला. आणि होत्याचं तिकीट पण काढलं.  
सकाळी कामावर जाताना किंवा संध्याकाळी  परतताना बस मध्ये कोणी त्याला आवाज दिला कि बंडू त्याचे तिकीट काढायचा.
बंडूचे मन खूप मोठ होते पण त्यामानाने त्याचा खिसा छोटा होता.  त्याचे  पैसे लवकर  संपायला  लागले. 
"आपले पैसे लवकर का संपतात?" या विषयावर खूप विचार करून बंडू अस्वस्थ झाला. या अस्वस्थ अवस्थेत त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बांद्रा स्टेशन आणि बीकेसी  मधलं  अंतर त्याने चालत जायचे ठरवलं. व्यायाम पण होईल आणि पैसे पण वाचतील.
काही दिवस बरे गेले. तब्येत पण बरी राहिली. पण बसचे तिकिटाचे वाचलेले पैसे आता चांभाराला जायला लागले. बाटाचे "सेकंड्स" मधून घेतलेल्या बुटाचा नकाशा पार बदलला. कोल्हापुरी चपल्यांच्या मूळ किमतीपेक्षा रिपेरिंगचा खर्च जास्त झाला.  बंडू पुन्हा विचारात पडला. आपण करायचं तरी काय?
एवढ मोठ अंतर रोज पायी कापणे शक्य नाही. बसचा प्रवास टाळणे शक्य नाही. तेव्हा एक च उपाय.  ट्रावेलिंग अलाउन्स वाढले पाहिजे.सगळे प्रश्न सुटतील. 
बंडूने अर्थमंत्र्याकडे अर्थात आपल्या बायकोकडे  चार्टर ऑफ डिमांड सादर केला.ट्रावेलिंग अलाउन्स मध्ये वाढएवढ च तो बोलला आणि बायको एकदम अंगावर आली, 'का?' अर्थ मंत्र्यांनी हा एकाक्षरी प्रश्न विचारला आणि बंडूची एक कलमी मागणी फेटाळली गेली. द्विपक्षी कराराची बोलणी संपली. ट्रावेलिंग अलाउन्स वाढला नाही!
बंडू आजारी पडला.
बेन्केच्या बाकी स्टाफला जो आजार झाला होता तो च आजार बंडूला पण झाला.
शांतपणे विचार करून बंडूने या आजाराची काही लक्षण शोधून काढली:
१. कंडक्टरचा टायमिंग बघून लोक ओळख दाखवतात.
२. आपआपली तिकीट काढून होईपर्यंत कोण कोणाशी बोलत नाही.
३. आपण तिकीट  घेतले हे ठाम माहिती माहित असलेला माणूस मुद्दाम सांगतो, 'बंडू, मी काढतो हं तिकीट?'
४. सर्वांची तिकीट काढून झाली कि हा आजार नाहीसा होतो. 
कथेचा सारांश:
बसमध्ये ओळख नाही दाखवणे हा सामुहिक आजार आहे. प्रत्येक आजाराला काही ना काही औषध नक्की असत. या आजाराला औषध नाही.
----------------------------------------------------
(Picture along with story is is for representative purpose only. It is taken from net.)

4 comments:

Raju Patel said...

खरं आहे आणि बरं आहे....-बंडू कथा-१ लिह्लं आहे म्हणजे बंडू सिरीज़ असावी....!! प्रतीक्षित---

Kishore Patel said...

राजू,
तुझी धारणा खरी आहे. मी ह्या ब्लोग वर बंडू मालिका रुजू करू इच्छितो.

Pinaki said...

wow ! i am looking forward to more Bandoo stories !

Kishore Patel said...

Pinaki, I am glad you like my Bandoo story. I intend to write series of Bandoo adventures. I assure you, you won't have to wait more for next episode full of fun!